पोस्ट्स

इकिगाई

इमेज
नुकतेच एक अतिशय सुंदर जगभरातून गौरवले गेलेले पुस्तक वाचले - इकिगाई - दीर्घायुषी निरोगी आणि आनंदी जीवनाचे जपानी रहस्य. पुस्तक वाचले आणि वाटलं की हे सर्व अविश्वसनीय आहे. इकिगाई हे पुस्तक आपल्याला आपल्या जीवनाचा उद्देश शोधण्यास जीवनाचे मूल्य समजण्यास मदत करते.             हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस हे या पुस्तकाचे लेखक आहेत. याचा मराठी अनुवाद प्रसाद ढापरे यांनी केला आहे. दोन्ही लेखक भेटल्यानंतर विविध विषयांबरोबरच जीवन व जीवनाचा उद्देश अशा गोष्टींवर चर्चा केली आणि त्या चर्चेतून 'इकिगाई' हा जादुई शब्दाला आला.              जपान मधील लोक हे दीर्घायुषी आहेत. त्यातल्या त्यात ओकिनावा प्रांतातील बहुतेक लोक तर शंभरीही पार करतात. पुस्तकाचा लेखकांनी जपानच्या शेकडो शंभरी पार केलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातून त्यांनी त्यांच्या तरुण आणि आनंदी राहण्याचे रहस्य उलघडले. जपानी लोकांचे खाणे पिणे त्यांची काम करण्याची पद्धत अशा गोष्टींची अभ्यासपूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आहे. या पुस्तकात इकिगाईची संकल्पना आणि ती जपानी लोकांना वृद्धापकाळातही निरोगी जीवन जगण्यास कशी मदत करते याची

आनंद छंद

इमेज
ज्यांनी आयुष्यात ध्येय ठरवलंय आणि एकलव्या सारखी तीक्ष्ण निष्ठा ठेवून त्यात यश मिळवलंय अशा व्यक्तींकडे अनुभवांची प्रचंड शिदोरी असते. आयुष्याची जडणघडण होताना भेटलेली माणसं, घेतलेले अनुभवी त्यांच्या आयुष्याला समृद्ध करत असतात. प्रत्येकाला ईश्वराने अनेक क्षमता सढळ हस्तानं बहाल केलेल्या असतात. पण प्रत्येकाला त्या वापरता आलेल्या नसतात. याची खंत प्रत्येकाला कधी ना कधी वाटतेच. कित्येक जण आपल्याकडे क्षमता तपासून पाहायचेही राहतात. कारण जगण्याच्या रहाटगाड्यामध्ये बांधिव आणि व्यस्त दिनक्रमामुळे स्वतःकडे वळून बघणं राहूनच जातं. मग आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचतो की, तेव्हा वाटतं अरेच्चा! माझं हे करायचं राहिलं, माझ्याकडे ती क्षमता होती, माझ्याकडे तो गुण होता, प्रयत्न केला असता तर मी ही आज एक चांगला चित्रकार, लेखक, कवी, गायक झालो असतो.  आपल्यातील प्रतिभा ओळखायला आपल्याकडे वेळच नसतो. जेव्हा वेळ असतो तेव्हा जगण्याच्या अनिवार्य धकाधकीत आपण वयाच्या अशा वळणावर पोहोचलेलो असतो की, छे! या वयात आता काय शिकायचं? लोक काय म्हणतील? अशा विचारांनी आपण स्वतःला त्या विचारापासून, इच्छेपासून दूर नेतो. खरंच  अंतरीच्या यात

चवीपुरतं लोणचं

इमेज
चवीपुरतं लोणचं साधंसुध पिठलं भाकरीचं जेवण असो किंवा अगदी पंचपक्वानाचं त्या जेवणाची चव वाढवायला लोणचं नावाचा छोटासा पदार्थ किती जमेची बाजू उचलतो ना! चटपटीत चवीचं लोणचं ताटात असलं आणि ते चवीनं खाणारा असला की सगळंच जमून जात. आजकाल छोट्या वाण्याच्या दुकानापासून ते मोठमोठ्या मॉल पर्यंत या लोणच्याने आपली जागा व्यापली आहे. विविध प्रकारचे, चवीचे अनेक लोणची गृहिणीच्या मनाला आनंद देतात कारण तिने केलेल्या स्वयंपाकाला लोणच्यामुळे एक वेगळाच साज चढतो. आंबा,मुळा,लिंबू,मिरची या मंडळींचा लोणच्याचा प्रांतात विशेष अधिकार आहे. यांच्या बरोबरीने कधीकधी गाजर,बोर ही मंडळी सुद्धा अलगदपणे मसाल्यात बुडून स्वतःला लोणचं म्हणवून घ्यायला तयार होतात. या सर्वावरून आठवलं पूर्वीच्या काळी उन्हाळ्यामध्ये कुरड्या- पापड्या याबरोबरीने घरोघरी लोणचे घालण्याची लगबग उडायची. आंब्याचे लोणचे घालण्यासाठी लागणारा आंबा हा खास करून 'लोणच्याचा आंबा' या नावानेच परिचित असतो. गावामध्ये तर कुणाच्या दारात किंवा शेतात लोणच्याच्या आंब्याचे झाड असेल तर त्यांना आधीच सांगून ठेवले जायचे. शेकड्याने असे आंबे आणून रात्री पाण्यात ठेवल