पोस्ट्स

ऑगस्ट, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझे आजोळ - बिसूर. भाग 1

इमेज
  आजोळ - बिसूर : भाग १ 'लहानपण देगा देवा’ असे म्हटले आहे ते मला अगदी योग्य वाटते. अजाण, कोवळ्या अशा या वयातील जबाबदारी नसलेले आयुष्य म्हणजे देवाने मानवाला दिलेली भेटच. बालपण ही आयुष्यातील अशी एक गोड पहाट असते, जी कधीच विसरता येत नाही. त्यातही ज्यांचे बालपण आजोळी गेले, त्यांना नशीबवानच मानले पाहिजे. ‘पळती झाडे पाहू या, मामाच्या गावाला जाऊ या’ असे स्वप्नवत मामाचे गाव माझ्यासाठी माहेरहून कमी नाही. माझे बालपण अशाच एका सुंदर, संथ आणि मायेने वेढलेल्या आजोळच्या गावात गेले. आज मागे वळून पाहताना, डोळे मिटले की सर्वांत आधी डोळ्यांसमोर उभा राहते माझे आजोळ… ‘बिसूर’चा निसर्गरम्य परिसर. बिसूर गावच्या अगदी जवळून एक खळाळत वाहणारा ओढा जायचा. तो अजूनही आहे. हा ओढा म्हणजे आमच्या बालपणाचा जिव्हाळ्याचा मित्र होता. त्या काळी ओढ्याला बारा महिने पाणी असायचे. पात्र अगदी रुंद, एका बाजूला गाव तर दुसऱ्या बाजूला शेती आणि माळ. माळावर विठ्ठल आणि बिरोबाचे मंदिर. तिकडे माळावर जायचे असल्यास ओढ्यातून जावे लागे. आम्ही वाटच पाहायचो की कधी ओढ्यात जायला मिळते. पावसाळ्यात ओढ्याला पूर यायचा. इतर वेळी पाणी कमी असले की तळाश...